Member-only story
सार्वजनिक गणेशोत्सव — काल आणि आज
१८९३ साली लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ या वर्तमानपत्रातुन सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना लोकांसमोर मांडली.
स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश सरकारने सार्वजनिक सभा आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली होती आणि जन-जागृतीसाठी लोकांना एकत्र आणणे अत्यंत गरजेचे होते. देशाला स्वातंत्र्य कसे मिळवुन देता येईल या विचाराने लोकमान्य टिळक भारले होते. लोकांना एकत्र कसे आणता येईल याचा विचार करत गिरगांव चौपाटीवर समुद्र किनारी बसल्या बसल्या ते वाळूपासुन मुर्त्या बनवत आणि त्या मुर्त्या पाहायला लोक जमा होत असत. त्या मुल्यांना पाहिल्यावर लोकांच्या येणाऱ्या प्रतिक्रियांवरून टिळकांच्या असे लक्षात आले की भारतीय लोक हे अत्यंत श्रद्धाळु आणि ईश्वराला घाबरणारे आहेत, देव आणि धार्मिक भावनांचा भारतीय जनमानसांच्या मनावर जबरदस्त पगडा आहे. धार्मिक कार्यासाठी आपापसातील हेवेदावे आणि वैर विसरून ते एकत्र येतात, यामुळे टिळकांच्या मनात विखुरलेल्या जनतेला एकत्र बांधण्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला. अशा प्रकारे लोकांच्या धार्मिक कारणासाठी एकत्र येण्याला ब्रिटीश सरकार विरोध करू शकणार नाही हे लोकमान्य टिळकांनी ओळखले आणि त्यातुनच गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप द्यायची कल्पना त्यांच्या मनात आली.
बुद्धीची देवता गणपती, ही सर्व स्तरातील लोकांना प्रिय आणि पुजनीय असल्यामुळे या कार्यासाठी त्यांनी गणेशाची निवड केली. हिंदु दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरवात झाली आणि अनंत चतुर्दशीला गणेश मुर्तीचे विसर्जन करायची प्रथा पडली. उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र जमत असत आणि त्यामुळे त्यांचे प्रबोधन करणे सहज शक्य होत असे. ब्रिटीश सरकार धार्मिक कारणास्तव या उत्सवाला विरोध करू शकत नसल्यामुळे टिळकांचा लोकांमध्ये राष्ट्राभिमान, एकता आणि…